उत्साहाचे भरते,
कधी न सरते
वेड्या मनास सदा,
काही ना काही स्फुरते
त्या मनाचे बोल,
ना कोणासही रुचतात
कंटाळतात सारेच,
जे जे हे बोल वाचतात
कोणी हसतात आणि,
म्हणतात हे फालतू
कोणी रागे भरून,
म्हणतात हे चुलीत घाल तू
तरी वेडे मन
,
काही ना काहीतरी लिहित राहते
कधी तरी कोणी वाचेल,
या आशेकडे डोळे लावून पाहते
ना दिली देवाने पुरती प्रतिभा,
यात त्याचा काय दोष
एक मात्र खरे कि त्याचा,
लिहिण्याचा कमी होत नाही सोस
काही झाले तरी त्याचा,
उत्साहाचा पूर नाही ओसरत
लिहिण्याची तृष्णा त्याची,
काही केल्या नाही सरत
वेडे मन म्हणते,
झाले असतील कित्येक कवी मोठे
पण आम्ही सुद्धा नाही,
काही नर्मदेतील गोटे
वेड्या मनास आता,
माझ्याशिवाय कोण समजावणार
कि एकदिवस लिहिता लिहिता,
तोच संपून जाणार
कालौघात त्याचे लिहिणे,
कुठेतरी दडणार
विझलेल्या उपेक्षित ज्योतीच्या
राखेप्रमाणे राहणार....
genius_pankaj