Friday, December 10, 2010

गुलाबाचे गर्वहरण



आज पाहिला मी एक गुलाब।
दाखवित होता फारच रुबाब॥

खरच तोही होता फार सुंदर।
पण पाहिला मी त्याचा गर्व एकंदर॥

मग मीही ठरविले शह देण्यास त्यास।
उभे केले त्यासमोर माझिया प्रियेस॥

पाहून तिस अक्षरशः लाजला गुलाब।
म्हणाला ही तर माझ्यापेक्षा लाजवाब॥

गर्व तेव्हा त्याचा पारच जिरला।
क्षमा कर म्हणुन तो उत्‍तरला॥



genius_pankaj

कवित्व........


हृदयाच्या अंतरंगात
एक दिवा सदा तेवतो
प्रतिभेचे तेल त्याला
नित्य कोण घालतो...

शब्दांचे फुलोरे
मनी कोण फुलवितो
करुनी एखादी रचना
मनास कोण रीझवितो....

ती स्वयंभू शक्ती
तिस माझा नमस्कार
तीच करी हे
कवित्व सारे साकार....

शतमूर्ख आम्ही
कशी असेल ही अमुची वाणी
हृदयातून स्रवतो काव्य
तो एक चक्रपाणी....

अगाध त्याची करणी
नाही त्यास तोड
रसिकासही मिळतो मग
चाखाया काव्यरस अतिगोड....


genius_pankaj

Monday, December 6, 2010

टाळले साऱ्या दिशांनी.............



तू दिलेस या हृदयी
घाव इतुके गंभीर खोल
कि जखमांच्या त्या निशाणी
पाहणे टाळले साऱ्या दिशांनी....


अगतिक हतबल मी तेव्हा
आसू थांबलेच न केव्हा
अवस्था ती माझी पाहुनी
सांत्वन टाळले साऱ्या दिशांनी.....


का तुझे ते असे वागणे
कधी मला न उमजले
प्रश्न मनी काही असे रुजले
कि गुंतागुंत त्यांची देखोनी
उत्तर टाळले साऱ्या दिशांनी....


जीवनास या, आता पुरता विटलो
येउंदे मृत्यू मग एकदा सुटलो
म्हटले घेई पंचमहाभूतांत समावोनी
पण अखेरचे तेही स्वप्न
टाळले साऱ्या दिशांनी.....


genius_pankaj


सोहळा सौंदर्याचा.........



खुलुनी एक कळी
मज आज खुणावते
सौंदर्य माझे अति मोहक
परी तुज कसे ते न लुभावते


ऐकून तिचे बोल
हास्य माझ्या ओठी फुलले
म्हटले मी तिला
काय सांगू तुला खुळे


मी सुद्धा एकदा असाच
पार भुललो होतो
या वाटेवरून मीही
असाच एकदा गेलो होतो


झाली तेव्हा चांगलीच फजिती
आणि तोंडघशी मी पडलो
अनुभवातून मी त्या
आता पुरताच घडलो


तेव्हा पासून हात मी जोडले
आणि कानही पकडले


ना जायचे कधीच
आपणास त्या गावा
सोहळा तो सौंदर्याचा
दुरुनची पहावा




genius_pankaj