Friday, April 6, 2012

अरे आभाळा आभाळा


अरे आभाळा आभाळा
थोडे शिंपड की तव जळा
पहा मम दाटुनी आला गळा
प्राण कंठाशी की रे आला...

पहा ग्रीष्म किती कठोर
करी नुसती लाही लाही
माझ्या तनुस ती रे न साही
घेऊन ये न त्या घनमाला
थोडे शिंपड की तव जळा...

वर्षाऋतूचा काळ आला
त्या शुभ्र धारांचा
चक्षुंस लागला लळा
पाहुंदे न तो सोहळा
थोडे शिंपड की तव जळा....

पहा सृष्टीच्या उदरात
भडकली भारी ज्वाला
निःस्थब्धही येथला
तरुंखालचा पालापाचोळा
साद घाली त्या वावटळीला
थोडे शिंपड की तव जळा....

बरसता तू धरती नाचेल
होऊनी अल्लड बाला
सृष्टी सारी क्षणात विसावेल
नसानसांत चैतन्य दरवळेल
मग मिळूनी आपण दोघे
भोगूया निवांत मृदगंधाला
थोडे शिंपड की तव जळा....

अरे आभाळा आभाळा....


genius_pankaj

No comments:

Post a Comment