Tuesday, August 21, 2012

कोण?

कोण?
कुणीतरी पुसले कोण?
तो बावरला थोडासा म्हटला कोण?
पुन्हा कोठूनसा आवाज ...विचारले कोण?
तो म्हटला मज न ठाऊक कोण?
यावर सारे जग हसले ......
जग पुनःपुन्हा हसले.....
त्याच्या मनाला ते फारच सलले
आणि मग शोध चालू झाला कोण?
तहान सरली,भूक सरली केवळ शोध कोण?
जिकडे तिकडे एकच शोध कोण?
मग सापडले असे काही विलक्षण...
मनी ब्रम्हानंद मुखी तेज भरभरून
जग आता म्हणे.....
यासारीखा आजवरी जाहला का कोण?


genius_pankaj

No comments:

Post a Comment