पानावरील दवबिंदू जसे
आयुष्य तसे जगावे
गळताना सुद्धा
क्षणभर चमकून जावे....
मेघातील जळ जसे
आयुष्य तसे जगावे
एखाद्या चातकाची
क्षुधा शमवूनी जावे ....
स्वच्छंद फुलपाखरू जसे
आयुष्य तसे जगावे
दोन दिसांचे जीवन
पण मुक्त बागडावे ....
प्रशांत जलधी जसा
आयुष्य तसे जगावे
अंतरात दडले रत्नमोती
तरी गर्वाचे पूर न उचंबळावे ....
तुफानातील दीपस्तंभ जसा
आयुष्य तसे जगावे
सारे आघात झेलूनही
कुणास तरी दिशादर्शक व्हावे ....
आयुष्य जगायला हवे जसे
आयुष्य तसे जगावे
संपल्यावर सुद्धा
प्रत्येकाच्या लेखणीतून उतरावे ....
genius_pankaj
No comments:
Post a Comment