Thursday, October 21, 2010

तू सोडून गेलीस........




तू सोडून गेलीस,
आणि हरवल्या माझ्या चांदराती
पसरला सारा मिट्ट काळोख
उरल्या केवळ अमावस्येच्या राती....


निद्रा गेली केव्हाच उडोन
कूस बदलून मी हैराण
स्वप्न नगरी मज तेव्हापासून
कधीच ना भेटली
सारे चित्र झाले वैराण....


प्राजक्त मनीचा आता न फुलतो,
ना फुलते कधीच रातराणी
जरी घालतो मी रोज त्यांना
डोळ्यांमधील आसवांचे पाणी....


लोपली केव्हाच येथली
आनंदाची मंजुळ गाणी
हृदयपटावर माझ्या आता
वाजते केवळ विराणी....


सारेच आता मनाला
अंधारलेले भयाण क्षण
आधार केवळ एक मनातील
मिणमिणती तुझी आठवण....


genius_pankaj

1 comment:

  1. हिच्यामध्ये तुझी उब शोधन नाही बर
    मी तुला विसरत चाललोय एवढ मात्र खर....

    हिचा हात घट्ट हातात ठेवला जरा धरून
    तुझ्या माझ्या सर्व जागा पाहिल्या पुन्हा फिरून...
    विसर विसर विसरताना पाहिलं तुला स्मरून

    तू होतीस नव्हतीस पण हीच हसणं होत
    सोबत माझ्या हीच असण तुझ नसणं होत
    खर सांगू हिच्या डोळ्यात माझच फसण होत

    हिच्या सोबत बांधिन म्हणतो मनामधली घर
    मी तुला विसरत चाललोय एवढ मात्र खर......

    असे तसे कसेतरी जगतात काही जण
    तस हिला जरा जरा कळत माझ मन

    संध्याकाळी गप्प होतो हेही हिला कळल
    तुझी बाजू घेऊन हिने खूप मला छळल

    खरच मला ठाऊक नाही हीच जुण काही
    कोणास ठाऊक का मी विचारल ही नाही


    आई म्हणते सोडून दयाव सगळं बुल बंर
    मी तुला विसरत चाललोय एवढ मात्र खर....

    तुझ्यासारखा आता मी कारण नसता हसतो
    कुणास ठाऊक तेव्हा मी हिला कसा दिसतो

    तुझी आठवण येतेय हिला आधी कळत
    माझ्या आधी डोळ्यामधून हिच्या पाणी गळत

    ओठ ठेवते गालांवरती समजून घेते खूप
    भळ भळणारया जखमे वर्ती असं साजुक तुप

    जगण्यासाठी आता मला एवढच सुख पुर होत
    मी तुला विसरत चाललोय एवढ मात्र खर..

    ReplyDelete